माजी खासदाराच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या काकांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचं नाव वायएस भास्कर रेड्डी असं आहे. भास्कर रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे काका आहेत.

विवेकानंद रेड्डी हे देखील जगनमोहन रेड्डी यांचे काका आणि भास्कर रेड्डी यांचे भाऊ होते. आंध्र प्रदेशच्या राज्य विधानसभा निवडणुकांपूर्वी 15 मार्च 2019 रोजी पुलिवेंदुला येथील विवेकानंद यांच्या निवासस्थानी त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने एक विशेष तपास पथक नेमलं होतं. पण, जुलै 2020मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, विवेकानंद रेड्डी कडप्पा लोकसभा मतदारसंघासाठी अविनाश रेड्डी यांच्याऐवजी आपण स्वतः, जगनमोहन रेड्डी यांची बहीण किंवा जगनमोहन रेड्डी यांच्या आईचं नाव सुचवून आपल्यापैकी एकाला तिकीट द्यावं, अशी मागणी केली होती. आता या प्रकरणी विवेकानंद रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे.