ओवाळीते भाऊराया रे….

सामना ऑनलाईन, मुंबई

दीपस्तंभ फाऊंडेशनने आश्रमशाळांमधील भटके विमुक्त वनवासी, आदिवासी तसेच अन्य गरीब व वंचित समाजांमधील मुलामुलींसोबत सामूहिक दिवाळी व भाऊबीज सोहळा शुक्रवारी सायंकाळी साजरा केला. शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे महापालिका शाळेच्या सभागृहात पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला. मुलांनी डोक्यात पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या आणि मुलींनी त्यांना ओवाळून बहिणीचे कर्तव्य बजावले.

आपली प्रतिक्रिया द्या