भाऊ कदम बनला ‘लिफ्टमन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेले भालचंद्र (भाऊ) कदम आता लिफ्टमनच्या भूमिकेत दिसणार आहे. झी समूहाच्या झी फाईव्ह निर्मित लिफ्टमन मालिकेत शीर्षक भूमिका करत आहेत. आज प्रदर्शित झालेली ही मालिका भाऊंच्या खास शैलीमुळे हास्याची कारंजी फुलवणारी ठरेल.

या मालिकेचे बहुतेक शूटिंग लिफ्टमध्ये झाले असून खाली-वर जाण्याच्या प्रवासात भाऊ आणि त्यांच्या वैचित्र्यपूर्ण विनोदबुद्धीचा सामना करावा लागलेली अनेकविध व्यक्तिमत्व या मालिकेतून समोर येणार आहेत. भरीस भर म्हणजे त्यांच्यासोबत लिफ्टमध्ये असताना लिफ्ट ब्रेक डाउन होऊन अडकून पडण्याची कल्पना तुम्ही करू शकता का? भाऊंचे विनोदाचे टायमिंग बघता, खो खो हसवण्याखेरीज दुसरे काही घडेल असे अपेक्षितच नाही. विनोदी भूमिकांसाठी आत्तापर्यंत प्रशंसा झालेले भाऊ कदम विनोद आवडणाऱ्यांचे सर्वांत लाडके अभिनेते आहेत. प्रेक्षकांना ओळखीच्या वाटतील अशा परिस्थितींच्या माध्यमातून लिफ्टमन लोकांच्या मानसशास्त्रात खोलवर जाते आणि निरनिराळे लोक एकाच परिस्थितीत कशा निरनिराळ्या प्रतिक्रिया देतात हे दाखवते.

२६ जुलै रोजी सुरू झालेली लिफ्टमन ही १० भागांची वेब मालिका आहे. प्रत्येक भाग ८-१० मिनिटांचा असून, प्रेक्षकांना वन लाइनर्स आणि विनोदांनी भरलेल्या गमतीशीर लिफ्टसफरीला तो घेऊन जाईल.