भवानी मंदिराचे कलशारोहण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रेडी

सिंधुदुर्गातील रेडी गावातील नागोळेवाडी येथे 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान श्री देवी भवानी नुतन मंदिराचा कलशारोहण सोहळा आयोजित केला आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता श्री देव सत्यपुरुष मंदिर, रेडी हुडावाडी येथे मंदिरात ठेवलेला श्री देवी भवानी मंदिराचा कलश निशाण-काठीसह वाजतगाजत श्री देवी माऊली मंदिराची प्रदक्षिणा करुन देवी भवानी मंदिरात ठेवण्यात येणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी संप्रोक्षण विधी, इतर विधी, नवचंडी विधान-भवानी परिवार स्नान विधी होणार आहे. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 नंतर प्रातःस्मरण, अग्नी आवाहन, नवचंडी विधान होणार आहे.

मंगळवार आणि बुधवारी दुपारी 1 नंतर नैवेद्य, आरती सायंकाळी विविध मंडळाची भजने, रात्री आरती असे कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारी सकाळी 9 नंतर प्रातःस्मरण, आकार शुद्धी, देवता पूजन, त्यानंतर सकाळी 10.56 या शुभ मुहूर्तावर कलशारोहण करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री 10 वाजता दशावतारी नाटक करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री देवी माऊली विश्वस्त, मानकरी आणि भूते परिवाराकडून करण्यात आले आहे.