हनुमानजी दलित, योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

रामभक्त श्री हनुमान हे दलित आदिवासी होते, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. या वक्तव्यावरून काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली आहे तर राजस्थान ब्राह्मण सभेने योगी आदित्यनाथ यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, हनुमान हे दलित-आदिवासी होते. त्यांनी सर्व हिंदुस्थानी समाजाला एकत्र करण्याचे काम केले. रामभक्तांनी भाजपला तर रावणभक्तांनी काँग्रेसला मते द्यावीत, असे अवाहनही आदित्यनाथ यांनी केले.