भीमा नदीच्या कोरडय़ा पडलेल्या पात्रामुळे पाण्याचा वेग मंदावला, सोलापूरला पाणी पोहोचण्यास 10 दिवस लागणार

उजनीतून सोडलेल्या पाण्याचा केग मंदावला असून, धरणापासून 35 किलोमीटर अंतरावर असणाऱया संगम येथे पोहोचायला 41 तासांचा वेळ लागला आहे. परवा दिकशी सायंकाळी पाच वाजता उजनी धरणातून पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. सर्वसाधारणपणे धरणातून सोडलेले पाणी तासाला एक किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने प्रवास करीत असते; मात्र कोरडे पडलेले पात्र, पाण्यासाठी शेतकऱयांनी नदीत खोदलेले खड्डे भरत पाणी तासाला अर्धा ते पाऊण किलोमीटर असा संथ गतीने प्रवास करीत पुढे सरकत आहे. त्यामुळे सोलापूरच्या औज बंधाऱयात पाणी पोहचण्यासाठी 10 दिवस लागणार आहेत.

उजनी धरणापासून 30 किलोमीटर अंतरावर असणाऱया नीरा नरसिंहपूर येथे 33 तासांनंतर पाणी पोहोचले असले तरी यापुढचा प्रवास मंदावत चालला आहे. नरसिंहपूरपासून संगमपर्यंतचे पाच किलोमीटर अंतर कापायला आठ तासांचा वेळ लागला आहे. यापुढे सर्व शेतीचे क्षेत्र असल्याने नदीतून पाणी पुढे सरकायला अजून वेळ वाढत जाणार आहे. सध्या प्रशासनाने पिण्यासाठी सोडलेल्या या पाण्याचा उपसा करू नये म्हणून भीमा नदीच्या दोन्ही तीरांवरील वीज प्रवाह खंडित केला आहे. उजनी धरण ते पंढरपूर हे अंतर 115 किलोमीटर असून, येथे पाणी पोहचायला चार किंवा पाच दिवसांचा वेळ लागणार असून, सोलापूरच्या औज बंधाऱयात पाणी पोहचायला तब्बल 10 दिवसांचा केळ लागेल.

सध्या भीमा नदी कोरडी असल्याने उजनी धरणातून पिण्यासाठी सोडलेले पाणी पंढरपूरला पोचायला चार दिवस, तर सोलापूरच्या औज बंधाऱयात पोचण्यास दहा दिवसांचा केळ लागणार आहे. पंढरपूर आणि सांगोला नगरपालिकेला पाणीपुरवठा करणारे बंधारे आहेत. याशिवाय सांगोल्यातील 81 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना आणि कासेगाव पाणीपुरवठा योजनेचेही बंधारे आहेत.

पंढरपूरकरून पाणी पुढे जाताना मंगळवेढा शहराला पाणीपुरवठा करणारा बंधारा असून, यानंतर सोलापूर महापालिकेचा औज बंधारा आहे. हे पाणी सोलापूरला जाताना बंधारे भरून घेतले जाणार आहेत. यामुळे पुढील दोन महिने या शहरांची तहान भागण्यास मदत होणार आहे. सध्या उजनी धरणात  75 टीएमसी पाणी आहे. शेतीसाठी एक पाळी पाणी सोडण्यास मात्र शासनाने नकार दिला आहे.

नीरा नदीत 3 हजार क्युसेक किसर्ग

नीरा खोऱयातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असणारे भाटघर धरण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 38 दिवस उशिरा भरले आहे. 21 सप्टेंबर रोजी भाटघर धरण 100 टक्के भरल्यानंतर नीरा नदीला 3 हजार क्युसेकने किसर्ग सुरू झाला आहे. यामुळे वीर धरणातही पाणी काढणार आहे. नीरा नदीत पाणी सोडल्याने सोलापूर जिह्यातील पश्चिम भागातील पंढरपूर, सांगोला व माळशिरस तालुक्यातील काही गावांना दिलासा मिळणार आहे. नीरा खोऱयात दरवर्षी हमखास पाऊस पडतो. नीरा देवघर धरण 20 ऑगस्ट रोजी 100 टक्के भरले, परंतु पावसाने ओढ दिल्याने पुन्हा धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. नीरा नदीवरील शेकटचे असलेले वीर धरण 100 टक्के भरले होते. सिंचनासाठी पाणी सोडल्याने धरणातील पाणीसाठा 44 टक्केपर्यंत खाली आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 टीएमसीचे भाटघर धरण 100 टक्के भरले आहे. त्यानंतर स्वयंचलित दरवाजातून 1400 क्युसेक तर वीजनिर्मितीसाठी 1614 क्युसेक विसर्ग सोडण्यात येऊ लागला आहे. हे पाणी नीरा नदीद्वारे वीर धरणात येत आहे. नीरा नदीवरील नीरा देवघर 99 टक्के (11 टीएमसी), कीर 44 टक्के (4 टीएमसी), गुंजकणी 93 टक्के (4 टीएमसी) आणि भाटघर 100 टक्के (23 टीएमसी) असा एकूण 42 टीएमसी पाणीसाठा असून नीरा खोऱयातील एकूण पाणीसाठा क्षमता 48 टीएमसी आहे. या धरणात 12 टक्के पाणीसाठा कमी आहे.