
भिवंडीमध्ये इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. इथल्या मौजे पिरानी पाडा,शांतीनगर नागांव भागामध्ये ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 5 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही इमारत अवघी 6 वर्षे जुनी होती. निकृष्ट बांधकामामुळे ही इमारत कोसळल्याचे सांंगण्यात येत आहे.
2 dead and 5 injured in the #Bhiwandi building collapse. This video was recorded when building was crumbling down pic.twitter.com/XeHNGRAmxc
— Saamana (@Saamanaonline) August 24, 2019
ही इमारत 4 माळ्याची होती आणि ती अत्यंत धोकादायक अवस्थेत होती. इथे राहात असलेल्या कुटुंबांना अग्निशमन दलामार्फत इमारतीतून स्थलांतरीत करण्याचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळल्याचे कळते आहे. पहाटे 2.10 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये 8 कुटुंब राहात असल्याची माहिती मिळाली होती ज्यातील काही कुटुंबे आधीच बाहेर काढण्यात आली होती.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांची नावे कळाली असून ती अब्दुल अजीज सय्यद मुलाणी (वय-55वर्षे), जावेद सलीम शेख (वय-36वर्षे) अशी आहेत. पोलीस, NDRF आणि TDRF चे जवान, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांचे जवान आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पहाटेपासूनच बचावकार्य सुरू केले आहे.
#UPDATE: 2 dead and 5 injured in the Bhiwandi building collapse. Rescue operations underway. https://t.co/Q3CmwdM95K
— ANI (@ANI) August 24, 2019
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अशोक रणखांब यांनी या इमारतीचा काही भाग कोसळू शकतो अशी माहिती मिळाली होती असं सांगितलं आहे. ही माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने इमारतीकडे निघाले असं रणखांब यांनी सांगितले.

























































