
मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या भोपाळमधील मेट्रोचा फुगा फुटला आहे. मेट्रो चालवण्यासाठी दररोज 8 लाख रुपये खर्च येत आहे, तर कमाई केवळ 15 ते 20 हजार रुपये होत आहे. प्रवाशांनी मेट्रो प्रवासाकडे पाठ फिरवल्याने मेट्रोला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मेट्रोचा ट्रक केवळ 7 ते 8 किलोमीटर लांब आहे. यात सात स्टेशनांचा समावेश आहे. कमी प्रवाशांमुळे मेट्रोच्या दैनंदिन फेऱयांची संख्या 17 वरून 9 करण्यात आली आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार मेट्रोचे भाडे खूपच जास्त आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करण्याऐवजी प्रवासी अन्य मार्गांचा अवलंब करतात.



























































