भूमी म्हणते कपडे ‘रिपीट’ वापरा

281

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचे पर्यावरणप्रेम आपल्याला ठाऊक आहे. ती घराच्या टेरेसवर भाजीपाल्याची लागवड करते. पर्यावरणपूरक अशा सवयी सर्वांनी लावून घ्याव्यात यासाठी ती आग्रही असते. आताही तिने लोकांना खास विनंती केलीय. तिने लोकांना पर्यावरणपूरक असलेल्या ब्रँडचे कपडे कापरायला आणि ते रिपीट करायला सांगितले आहे. भूमीने म्हटलंय, कपडय़ांना पुनःपुन्हा वापरणे ही चांगली सवय आहे. कारण याचा पर्यावरणाशी संबंध आहे. मी माझे कपडे रिपीट करते. मला एकाच कपडय़ात बघून लोक काय म्हणतील, याचा मी विचार करत नाही. रिपीट कपडय़ाने कमीपणा येत नाही. मला असंही दिसतंय की लोक कपडे भाडय़ाने घेत आहेत. भाडेतत्त्वावर कपडे घेण्याची आयडिया एकदम कमाल आहे. मी आणि माझ्या बहिणीकडे एकच कॉर्डरोब आहे. आम्ही दोघी एकमेकींचे कपडे वापरतो, तेही पर्यावरणाला हानी करणार नाही अशा ब्रँडचे!

आपली प्रतिक्रिया द्या