नांदेड गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भुपेंद्रसिंग मनहास यांची 51 लाखांची पूरग्रस्तांना मदत

354

नांदेड गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष तथा मुंबईचे प्रसिध्द उद्योजक भुपेंद्रसिंग मनहास यांनी वैयक्तिकरित्या पूरग्रस्तांना 51 लाख रूपयांची मदत केली आहे. आर्थिक मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला. यावेळी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हरिभाऊ बागडे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना पूराचा तडाखा बसल्यामुळे मोठया प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी झाली आहे. मनहास यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 51 लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. पूरग्रस्तांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत. त्याचप्रमाणे मनहास यांनी सामाजिक बांधीलकी जपत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या