भायखळ्यातून अपहरण केलेल्या तरुणाची वडाळ्यात निर्घृण हत्या

408
प्रातिनिधिक फोटो

वडाळा येथे सोमवारी रात्री गंभीर मारहाण केलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली. गणेश पोळ (29) असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याचे अपहरण करून मग त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. गणेशचे अपहरण केल्याप्रकरणी भायखळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

वडाळ्यातील गोदरेज जंक्शन येथे डोके फुटलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सोमवारी रात्री वडाळा पोलिसांना सापडला होता. तपासात मृत व्यक्तीचे नाव गणेश पोळ असल्याचे समोर आले. तसेच तो चालक असून त्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा भायखळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता अशीही माहिती समोर आली. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, तर गणेशचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री भायखळा पोलिसानी गणेशचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ताब्यातील आरोपींत सुशांतचा समावेश असून तो काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला. यापूर्वीदेखील सुशांतने गणेशवर गोळीबार केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या