मृत्यूची कामना करणाऱ्या ट्रोलरवर महानायक अमिताभ भडकले, देवाच्या कृपेने जगलो-वाचलो तर…

5784

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिग बी यांना कोरोना झाल्याचे कळताच देश, विदेशातील चाहत्यांनी देवाकडे त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी कामना सुरू केली. सोशल मीडियावरही त्यांच्यासाठी माळा जपल्या जात आहे. मात्र काही खोडसर लोक मात्र त्यांच्याविरोधात गरळ ओकत असून अशाच एका ट्रोलरला बिग बी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बिग बी यांना कोरोनाची लागण झाल्यावर एका ट्रोलरने ‘काश कोरोनामुळे तुमचा मृत्यू झाला असता’, असे म्हटले. यामुळे बिग बी भडकले असून त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये या ट्रोलरचा चांगलाच समाचार घेतला. बिग बी म्हणतात, ‘हे मिस्टर अज्ञात… तुम्ही तुमच्या वडिलांचे नाव देखील लिहीत नाहीत, कारण तुम्हाला तुमचे वडील कोण आहेत हेच माहिती नाही. आणि हो फक्त दोनच गोष्टी होऊ शकतात. एक तर माझा मृत्यू होऊ शकतो किंवा मी जिवंत राहू शकतो. माझा मृत्यू झाल्यास तुम्ही एका सेलेब्रिटीचा रागाराग करू शकणार नाही आणि त्याला दूषणे देण्याचे कामही करू शकणार नाही. तसेच तुम्ही काय लिहिले याकडे लक्ष देणारेही कोणी नसेल, असेही बिग बी आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात.

यापुढे ट्रोलरला कठोर भाषेत उत्तर देताना बिग बी लिहितात, जर देवाच्या कृपेने मी जिवंत राहिलो तर तुला फक्त माझ्याच नाही तर माझ्या 9 कोटी फॉलोअर्स आणि चाहत्यांच्या रागाचा सामना करावा लागेल. मला आता एवढेच सांगायचे आहे की मी वाचलो तर योग्य उत्तर देईल. माझे चाहते जगभरात आहेत. पश्चिम ते पूर्व आणि उत्तर ते दक्षिण सर्वत्र माझे चाहते आहेत, असेही बिग बी म्हणतात.

article-202072097525728377000-09-05-pm

आपली प्रतिक्रिया द्या