बिग बी आणि डॉन 17 वर्षांनंतर एकत्र

बॉलीवूडमधील सुपरस्टार्स म्हटले की दोन नावे डोळ्यासमोर येतात ती म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. या दोन सुपरस्टार्संनी बॉलीवूडवर राज्य करत आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र काम करावे याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतून प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवली आहे. आता पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान एकत्र काम करण्यास सज्ज आहेत. तब्बल 17 वर्षांनी हे दोघे एकत्र येत अफलातून प्रोजेक्ट साकारत आहेत. मनोरंजन क्षेत्र या सुपरस्टार्सचा दमदार अभिनय पाहण्यासाठी वाट बघत आहे.