बिग बींनी भरला 70 कोटी रुपयांचा कर

13

सामना प्रतिनिधी। मुंबई

महानायक बिग बी हे यंदाच्या वर्षातले बॉलीवूडमध्ये सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रेटी ठरले आहेत. 2018-19 या आर्थिक वर्षात अमिताभ बच्चन यांनी तब्बल 70 कोटी रूपयांचा कर भरल्याची माहिती त्यांच्या अधिकृत प्रवक्त्याने दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी 70 कोटी रूपयांचा कर भरला असून जम्मू कश्मीरातील पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटूंबियांना प्रत्येकी दहा लाख रूपयांचा मदतनिधी देखील दिला आहे. त्याशिवाय बिहारच्या मुझफ्फरपूर येथील 2084 शेतक-यांचे कर्जही त्यांनी फेडण्याची माहिती प्रवक्त्याने दिली आहे. यंदाच्या वर्षी बिग बी बदला या सिनेमात झळकले होते. याशिवाय आगामी काळात ते रणबीर कपूर आणि आलीया भट्टसोबत ब्रम्हास्त्र यासिनेमात झळकणार आहेत. नुकतीच त्यांनी तमीळ सिनेमाच्या चित्रीकरणाला देखील सुरूवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या