भलामोठा समोसा बघितला का…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेटवर दररोज खाण्यापिण्याच्या गोष्टी, फोटो आणि हटके पाककृतींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भलामोठा समोसा चर्चेत आला आहे. तसंही समोसा खाणं लोकांना आवडतं. एकावेळी दोन-तीन समोसे आरामात फस्त केले जाऊ शकतात, पण हा समोसा वेगळाच आहे. तो कापण्यासाठी चक्क मोठा चाकू लागतो. एकीने तो हाताने उचलून खाण्याचा प्रयत्न केला, पण ते तिला जमलंच नाही. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर ही मुलगी फूडब्लॉगर असून ती अशा अतरंगी खाद्यपदार्थांचे व्हिडीओ शेअर करत असते. चाहत आनंद या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तो अपलोड करण्यात आला आहे. या फूडब्लॉगरचे व्हिडीओ नेटीजन्सला खूप आवडतात. या व्हिडिओला आतापर्यंत 20 दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.