हिंदुस्थानी भाऊ बिग बॉसमध्येही शिव्या देणार? प्रेक्षकांना उत्सुकता

2283

पहले फुरसतें निकल, असं म्हणत सोशल मीडियावर तुफान गाजलेला हिंदुस्थानी भाऊ आता लवकरच बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये दिसणार आहे. त्याच्या येण्याने बिग बॉसमध्ये आता चांगलीच रंगत येण्याची शक्यता असल्याने त्याचे चाहते भलतेच खूश झाले आहेत.

हिंदुस्थानी भाऊचं खरं नाव विकास पाठक असं आहे. हिंदुस्थानी भाऊ हा प्रसिद्ध युट्युबर असून त्याचे युट्युबवर 9 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हिंदुस्थानविरोधात गरळ ओकणाऱ्यांचा हिंदुस्थानी भाऊ समाचार घेत असतो. देशाविरोधात बोलणाऱ्या तिथल्या नेटीझन्सना तो शिव्या देत राहतो. त्याच्या शिवराळ भाषेमुळे त्याला जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या याच क्रेझमुळे बिग बॉसमध्ये त्याला सामील करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता त्याच्या आगमनामुळे बिग बॉसच्या घरात नक्की काय काय होतं, ते बघणं औत्सुक्याचं असणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं असून सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत.

बिग बॉससाठीचे स्पर्धक निवडण्यासाठीच्या निकषांमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्यांना या शोमध्ये संधी देण्याचं ठरवण्यात आल्याचं यामुळेच हिंदुस्थानी भाऊचंही नाव चर्चेत आलं होतं. मराठी बिग बॉसमध्ये देखील अशाच पद्धतीचा प्रयत्न करण्यात आला होता. अभिजीत बिचुकले हा एक वेगळा चेहरा बिग बॉस मराठीमध्ये आणण्यात आला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या