Bigg Boss 13चा नवीन प्रोमो लाँच, हे सेलिब्रिटी असणार घरातले सदस्य

2922

बहुप्रतिक्षित बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा नवीन प्रोमो लाँच झाला आहे. या सिझनमध्ये अनेक ट्विस्ट बघायला मिळणार आहेत. त्याची नांदी सलमानच्या “ये सीजन थोड़ा टेढ़ा रहने वाला है” या डायलॉगने झाली आहे.

गंमत म्हणजे या सिझनमध्ये पहिल्या चार आठवड्यातच फिनालेसाठी निवड केली जाणार आहे. हा सिझन वेगवान असेल याकडे निर्मात्यांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे हा ट्विस्ट देण्यात आला आहे. या बिगबॉसच्या सिझनसाठीचा सेट लोणावळ्यात नसून तो गोरेगाव येथे फिल्म सिटीत लावला आहे. बिग बॉसच्या विजेत्याला मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली असून आता ती रक्कम 50 लाखांवरून 1 कोटी करण्यात आली आहे.

या सिझनमध्ये मुग्धा गोडसे, सिद्धार्थ शुक्ला, माहिका शर्मा, चंकी पांडे, राजपाल यादव, देबोलिना भट्टाचारजी, आदित्य नारायण यांची नावे निश्चित झाली आहेत. अन्य सदस्य कोण असतील हेही लवकरच कळणार आहे. आता या सिझनमध्ये नक्की काय पाहायला मिळणार आणि वेगवान घडामोडी नेमक्या कशा घडणार, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या