बिग बॉसच्या घरामध्ये दसऱ्यानिमित्त खास सेलिब्रेशन, पाहा दोन तासाचा विशेष भाग

बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी दसऱ्यानिमित्त खास सेलिब्रेशन ठेवले आहे. या सेलिब्रेशनसाठी सदस्यही छान तयार झाले असून मजा मस्ती करताना दिसणार आहेत. नुसतं सेलिब्रेशनच नव्हे तर बिग बॉस सदस्यांना अनोखे सरप्राईज देऊन त्यांचा दिवस खास करणार आहेत.

copule-pic-jpg-canva-3

दसरा सणानिमित्त आज घरातील सर्व सदस्य वाद विवाद, रुसवे-फुगवे, घरात पडलेले गट सगळं विसरून एकत्र येऊन या सेलिब्रेशनचा भाग होणार आहेत. यावेळी ‘आईचा जोगवा मागेन’ या गाण्यावर महिला सदस्य अप्रतिम नृत्य देखील सादर  करणार आहेत. या सेलिब्रेशनचे वैशिष्ट्य असणार आहे ते सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाची विजेती स्पर्धक अक्षया अय्यर आणि सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचा स्पर्धक विश्वजित बोरवणकर हे त्यांच्या सुरेल आवाजात एकसे बडकर एक गाणी सादर करणार आहेत. सर्व सदस्य मोठया उत्साहात सेलिब्रेट करताना दिसणार आहेत. तेव्हा कलर्स वाहिनीवरील आजचा हा विशेष भाग दोन तासाचा असून  आज रात्री 9.30 वा. पाहायला मिळेल.