‘हे’ असणार आहेत मराठी बिग बॉसच्या सहाव्या सिझनचे स्पर्धक

बिग बॉस मराठी 6 मराठी लवकरच सुरू होणार आहे. अद्याप तारखेची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र रविवारी 7 डिसेंबरला 2025 हिंदी बिग बॉसचा 19 वा सिझन संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर लगेचच बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सुरू होईल असे बोलले जात आहे.

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सोशल मीडियावर काही जणांची जोरदार चर्चा रंगली आहे. यात कायम चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते, लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील, अनुश्री माने, डॅनी पंडित, अथर्व रुके, गिरीजा ओक, संजू राठोड, इशा केसकर यांची नावं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

प्रणित मोरे हिंदीमधून मराठीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिग बॉस मराठी सिझन 5 मध्ये फायनलिस्ट ठरलेली निक्की तांबोळी ही आधी हिंदी बिग बॉसमध्ये झळकलेली व त्यानंतर ती मराठी बिग बॉसमध्ये आलेली. तसाच आता सध्या हिंदी बिग बॉसच्या घरात असलेला प्रणित मोरे हा देखील हिंदी बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मराठी बिग बॉसमध्ये झळकू शकतो असे बोलले जात आहे.