
बिहारच्या बक्सर जिल्ह्यात कचऱ्याच्या ढिगात कोरोनाची लस सापडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या बाहेरील भागात असलेल्या कचऱ्यातच ही लस सापडली आहे.
बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर कोविशिल्ड लसीचे डोस मिळाले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कचऱ्याच्या ढिगात लस सापडल्यानंतर आरोग्य केंद्राचे प्रमुख व्यवस्थापक विनोद कुमार यांनी घटनास्थळी पोहोचून सगळ्या लसी जमा करवल्या आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
दुसरीकडे बक्सर येथील सिव्हिल सर्जन जितेंद्र नाथ यांनी या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. लवकरच या निष्काळजीपणामागे नेमकं कोण आहे, याची माहिती मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.


























































