
सामना ऑनलाईन। पाटणा
बिहारमधील पूर्णिया येथे सोमवारी पहाटे एक प्रवासी बस रस्ता दुभाजकावर धडकली व तिने पेट घेतला. यात 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस मुजफ्फरपूर येथून सिलिगुडीला जात होती.
बसला अपघात झाल्याचे कळताच पोलीस व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत बसने पेट घेतला होता. यामुळे सर्व प्रवाशांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. यावेळी आगीत होरपळून २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले.

























































