
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आपल्याकडे लग्न किंवा पार्टीमध्ये दारू पिणे हे आता सभ्य समाजाचे लक्षण मानले जात आहे. लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र बऱ्याचदा दारू पिऊन धिंगाणा घालतानाही पाहिले आहे. परंतु बिहारमध्ये नवरदेवच स्वत:च्या लग्नामध्ये खंडीभर दाऊ प्यायला आणि माकडचाळे करू लागला. हे माकडचाळे पाहून नवरी मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याला अद्दल घडवण्यासाठी लग्न मोडले.
बिहारच्या छपरा येथे रिंकी कुमारी आणि बबलू कुमार यांचा लग्न सोहळा सुरू होता. लग्नसोहळा ऐन रंगात आता असताना नवरदेव बबलू याने प्रमाणापेक्षा जास्त दारू प्यायली. दारू जास्त झाल्याने त्याला स्वत:च्या पायावर धड उभेही राहता येत नव्हते. त्याने तो मंडपामध्ये माकडचाळे करू लागला. हे दृश्य पाहून नवरी मुलीने लग्नास नकार दिला. नवरी मुलीच्या कुटुंबीयांनीही तिला साथ लग्न मोडले आणि नवरदेवाला बिनालग्नाचे माघारी धाडले.
याबाबत एएनआयाशी बोलताना नवरी मुलीचे वडील त्रिभूवन शाह म्हणाले की, ‘नवरदेव एवढा नशेत होता की त्याला आपल्या आजूबाजूला काय सुरूच हेच कळत नव्हते. लग्नासाठी बनवण्यात आलेल्या मंचावर जाऊन तो माकडचाळे करू लागला. त्यामुळे मुलीने लग्नास नकार दिला.’ यानंतर गावकऱ्यांनी लग्नासाठी घेतलेला हुंडाही नवरदेवाकडून काढून घेतला आणि मगच त्याची रवानगी केली.
Chhapra: A bride refused to get married after the groom allegedly turned up in an inebriated state for the marriage. Bride’s father says, “The groom was so drunk that he was unaware of his surroundings. He misbehaved on the stage, so my daughter refused to marry him.” #Bihar(9/3) pic.twitter.com/DToftGXlah
— ANI (@ANI) March 10, 2019

























































