बिहारमध्ये प्रवासी मजुरांना वाटले कंडोम, कुटुंब नियोजनासाठी राज्य सरकारचे पाऊल

2557

कोरोना संकट काळात बिहारमध्ये अनेक प्रवासी मजुरांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा क्वारंटाईन काळ संपल्यानंतर त्यांना कंडोम वाटण्यात आले आहे. लॉकडाऊनदरम्यान लोकसंख्या नियंत्रणात रहावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.


कुंटुंब कल्याण विभागाकडून प्रत्येक मजुराला कंडोम आणि गर्भनिरोधक औषधं दिली जात आहेत. लाखो मजुर आता घरी परततील त्यासाठी ही औषधं महत्त्वाची असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील लोकसंख्या नियंत्रणात राहील असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

प्रत्येक मजुराला कंडोमचे दोन पाकिटे दिली जात आहेत. तसेच आशाचे कर्मचारी घरोघरी जाऊन कंडोमचे पाकीटं वाटली जात आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये पोलिओचे डोस देणार्‍या कर्मचार्‍यांनाही ही जवाबदारी देण्यात आली आहे.

कुटुंब नियोजनाच्या या कार्यक्रमाचा विस्तार सरकार करणार आहे. हा कार्यक्रम जूनच्या 15 तारखेपर्यंत सुरू राहील. आतापर्यंत 13 लाख प्रवासी क्वारंटाईन सेंटरमध्ये थांबले आहेत, प्रत्येक मजुरांना कंडोमचे पाकीट मिळाले पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

आपली प्रतिक्रिया द्या