वडिलांचे झाले निधन, खर्चाच्या भितीने मुलाने बायकोसह काढला पळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नात्याला काळामा फासणारी घटना घडली आहे. वडिलांच्या निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराच्या खर्च करावा लागेल. या भितीने त्यांचा मृतदेह सोडून मुलाने बायकोसह पळ काढल्याची संतापजनक घटना बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मिसफ्फिल येथे घडली आहे. बराच वेळ मृतदेह तसाच असल्याने अखेर ग्रामस्थांनी पोलिसांना त्याबाबत माहिती दिली आणि त्यांनीच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

मुफस्सिल परिसरातील बसाढी गाव निवासी राज कुमार सिंह हे पटना येथील दीघा येथे नीरज कुमार सिंह येथे काम करायचे. त्यामुळे बसाढी येथील घरी त्यांचे खूप कमी येणे जाणे होते. मुलगा आणि सून त्यांना पटण्याला भेटायला जायचे तिथून येताना त्यांची सगळी जमापुंजी घेऊन जायचे.

दरम्यान राजकुमार सिंह यांची तब्येत अचानक बिघडली. मात्र मुलगा आणि सून त्यांच्यावर उपचार करत नव्हते. अखेर तडफडून त्यांनी प्राण सोडला. मात्र त्याहून कळस म्हणजे त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी रूग्णवाहिकेतून नेल्यानंतर मृतदेह पाहिल्यावर मुलगा आणि सूनेने घराला टाळे ठोकून पळ काढला. ग्रामस्थांना हे पाहून आश्चर्य झाले आणि त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. त्यांना सगळी हकीकत सांगितली. राजकुमार सिंग यांना मुखाग्नी द्यायला कोणी नव्हते अखेर ग्रामस्थांनीच त्यावर अंत्यसंस्कार केले.