बिहारमध्ये गुंडाराज, भररस्त्यात महापौरांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमधील कठिहार शहराचे महापौर शिवराज पासवान यांची काही गुंडांनी भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली. ते कार्यालयीन काम संपवून मंदिरात गेले होते. तेथून परतत असताना रात्री साडे नऊच्या सुमारास घरी त्यांची हत्या करण्यात आली.

शिवराज पासवान हे संतोष कॉलनीत राहतात व तेथेच घरापासून काही अंतरावर बाईवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांना अगदी जवळून तीन गोळ्या घालण्यात आल्या. या तीनही गोळ्या त्यांच्या छातीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शिवराज यांच्या हत्येनंतर त्यांच्या घराजवळील परिसरात व रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. शिवराज यांच्या नातेवाईकांनी व समर्थकांनी तत्काळ त्या गुंडांना अटक करा त्याशिवाय त्यांचे पोस्टमॉर्टम होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अद्याप शिवराज यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम होऊ शकलेले नाही.