लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, किडनीचा विकार बळावल्याने चिंता वाढली

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव सध्या रांचीच्या राजेंद्र प्रसाद इन्स्टिटय़ूट रुग्णालयात उपचार घेत आहेत. किडनीविकाराने पुन्हा उचल खाल्याने लालूप्रसाद यांची प्रकृती गंभीर झाल्याचे वृत्त आहे. त्यांची किडनी 25 टक्केच काम करीत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. उमेश प्रसाद यांनी शनिवारी दिली.

चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेले लालूप्रसाद यांना प्रकृती बिघडल्याने रांचीच्या राजेंद्र प्रसाद इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. लालूंच्या किडनीतील क्रिएटिनिन पातळी वाढल्याने त्यांना त्रास होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याच्यावर डायलिसिस उपचार करावे लागणार आहेत.