बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून जाळले

GANGRAPE IN BIHAR

बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करू तिला जाळण्यात आले आहे.

बिहारच्या मुझफ्फरपुरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे, इतकेच नाही तर बलात्कार झाल्यानंतर तिला जाळले आहे. News 18 hindi ने दिलेल्या वृत्तानुसार नराधम आरोपींनी डिसेंबरमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता आणि तिचे व्हिडीओ,फोटो काढून ब्लॅकमेल केले होते. 3 जानेवारी रोजी या आरोपींनी घरात घुसून पुन्हा पीडितेवर बलात्कार केला आणि तिला जाळले.

पीडित मुलीच्या वडिलांनी चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या