चिंता नको, राष्ट्रीय जनता दलाचा भविष्यकाळ उज्ज्वल! लालूप्रसाद यादव यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या राष्ट्रीय जनता दलाचा पडता काळ असला तरी भविष्यकाळ मात्र उज्ज्वल असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करू नये, असा विश्वास राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि तेजस्वी होता म्हणून आज मी तुमच्यापुढे दिसतोय, ते नसते तर रांचीमध्येच माझा शेवट झाला असता. पण तसे झालेले नाही, त्यामुळे मी लवकरच पाटण्याला येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

राष्ट्रीय जनता दलाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आज लालूप्रसाद यादव यांनी जवळपास अर्धा तास कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मी तुरुंगात अडकून पडलो होतो, बाहेर येता आले नाही. तरीही तुम्ही आणि तेजस्वी याने चिंता करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि नितीशकुमार सरकारवर टीका केली. माझ्या काळात जंगलराज नव्हते, तर गरीबराज होते, असेही लालू म्हणाले. लालू यांनी यावेळी तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांचे काैतुक केले.

आम्ही संपू, पण मागे हटणार नाही

केंद्र सरकार आणि राज्य सरकारची सध्या मनमानी चालू आहे. काहींकडून आता अयोध्यानंतर मथुरा आशा घोषणा दिल्या जात आहेत. यावरून ते देशात अराजकता अणू पाहत आहेत, पण आता आम्ही त्यांची मनमानी चालू देणार नाही. एकवेळ आम्ही संपू, पण मागे हटणार नाही, असा इशारा लालूप्रसाद यादव यांनी सरकारला दिला.