काय सांगता! लोकांनी चक्क रस्ताच पळवला, व्हिडीओ होतोय व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नितीश कुमार यांच्या बिहार राज्यातून अनेक चित्र-विचित्र व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लोकांनी कधी कांदे पळवले, मासे पळवले आणि दारु पळवण्यात सुध्दा लोकांनी हात साफ करून घेतला. पण आता चक्क रस्ता पळवून नेत असल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

बिहार राज्यातील मखदुमपुर शहरातील औदान बिगहा गावातील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनूसार, गावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरु होते. जेवढा रस्ता बनवण्यात आला तेवढा रस्ता गावातीलच काही चोरट्यांनी पळवून नेला. सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवण्यासाठी वापरण्यात आलेले सिमेंट, वाळू भुरट्यांनी पळवून नेले. त्यामुळे गावातील या रस्त्याच काम पूर्ण होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जेवढा रस्ता बनवण्यात आला होता, तेवढा रस्ता चोरट्यांनी गायब केला आहे.

गावकऱ्यांनी आपली कैफियत मांडताना सांगितले की, तीन किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्यात येणार होता. तीन महिन्यांपुर्वी राजदचे आमदार सतीश कुमार दास यांनी रस्त्याचे काम सुरू केले होते. यापूर्वी सुध्दा रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. पण काही भुरटे संधी साधत साहित्य लुटून रस्ता साफ करुन टाकतात, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.