माकडाने तरुणीच्या मोबाईलवरून केली ऑनलाईन शॉपिंग

1244

चीनमधील के के जिंगसू प्रांतातील येंगयेगं प्राणीसंग्रहालयात गेल्या आठवड्यात एक विचित्र पण मजेशीर घटना घडल्याचे समोर आले आहे. येथे प्राणीसंग्रहालयात प्राण्यांची देखभाल करणारी लेव मेंगमेंग ही तरुणी माकडाचे जेवण आणण्यासाठी घाईत दुसरीकडे गेली. पण तिचा मोबाईल मात्र तिथेच राहीला. त्याच वेळात पिंजऱ्याजवळ उभ्या असलेल्या एका माकडाच्या पिल्लाची नजर त्या मोबाईलवर गेली आणि उलटसुलट बटण दाबून चक्क ऑनलाईन शॉपिंग केली.

online-4

तरुणी जेव्हा परत माकडाच्या पिंजऱ्याजवळ आली तेव्हा तिची नजर तिथे पडलेल्या मोबाईलवर गेली आणि तिला धक्काच बसला. कारण मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंग झाल्याचे नोटीफीकेशन झळकत होते. पण ही शॉपिंग कोणी केली असावी हे तिला कळत नव्हते. कारण ज्यावेळी ती बाहेर गेली तेव्हा माकडांशिवाय कोणीही तिच्या आजूबाजूस नव्हते. यामुळे तिने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यातील दृश्ये बघून हसावे की रडावे हे तिला कळेनासे झाले. कारण फूटेजमध्ये मोबाईल एका माकडाच्या हातात दिसत होता. एवढेच नव्हे तर माकड मोबाईल स्क्रिनवर टाईप केल्याप्रमाणे बोटांची हालचाल करत असल्याचे तिला दिसले. त्यानंतर सगळा प्रकार तिच्या लक्षात आला.

आपली प्रतिक्रिया द्या