बाईक, रिक्षा, कार, टेम्पो ठाण्यात बेवारस गाड्यांची उचलबांगडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्व्हिस रोडसह रस्त्याच्या दुतर्फा वर्षानुवर्षे बेवारस स्थितीत धूळखात पडलेल्या भंगारगाड्यांची उचलबांगडी करण्याची जोरदार मोहीम ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाने हाती घेतली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये या खटारा गाड्या आड येत असल्याने शहराच्या सौंदर्यात खीळ बसत आहे. त्यामुळे सर्वाधिक बेवारस गाड्यांची बजबजपुरी असलेल्या वागळे आणि लोकमान्यनगर येथून या कारवाईला सुरुवात झाली असून आतापर्यंत शंभरहून अधिक वाहने हटविण्यात आली आहेत.

विकासाच्या दिशेने झेप घेणाऱ्या ठाण्यातील रस्तेही प्रशस्त झाले आहेत. मात्र तरीही शहराला वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बेवारस गाड्यांची संख्या काढत असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसत असल्याची बोंब वारंवार जागृत ठाणेकरांनी केली आहे. मात्र त्याकडे सुरुवातीला डोळेझाक करण्यात आली. त्यामुळे रस्त्यांवर बेवारस, खटारा गाड्यांची संख्या वाढतच गेली. ही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की त्यामुळे ठाण्यातील प्रशस्त रस्तेही बकाल दिसू लागले. हा बकालपणा स्वच्छता सर्वेक्षणात अडचण ठरू शकते हे लक्षात आल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आणि शहरामध्ये खटारा बेवारस वाहने उचलण्याची मोहीम सुरू झाली. त्यासाठी पालिकेने ठाणे वाहतूक विभागाची मदत घेतली आहे.

  • दुतर्फा अडवलेले रस्ते मोकळे होणार
  • वाहतूक विभाग, महापालिकेची मोहीम
  • वागळे इस्टेट येथे रोड क्रमांक 16, 33, 22 या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेवारस गाड्या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर परिसरातील शंभरहून अधिक गाड्या हटविण्यात आल्या आहेत.

फोटो काढा, पालिकेला पाठवा!
भंगार बेवारस गाडय़ा हटवण्याच्या मोहिमेत महापालिकेने ठाणेकरांचाही सहभाग मागितला आहे. त्यासाठी एखाद्या परिसरात भंगारगाडी दिसल्यास त्याचा फोटो काढून [email protected] या मेल आयडीकर पाठकिण्याचे आकाहन पालिकेने ठाणेकरांना केले आहे.