
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्यभरात भव्यदिव्य स्वरूपात साजरे करण्यात येणार आहे. सोमवारी शिवसेना भवन येथे राज्यभरातील जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील नगरसेवक यांच्या बैठकीत याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, अंगिकृत संघटना या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक जिल्हय़ांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत यावेळी उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी जबाबदारीही निश्चित करण्यात आली. या बैठकीला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.




























































