
बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली संगीत शिक्षकाची 2 लाख 43 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला माटुंगा पोलिसांनी अटक केली. मोहंमद जबीर असे त्याचे नाव असून फसवणुकीचे 71 लाख रुपये त्याच्या खात्यात जमा झाले होते. त्याने 12 लाख रुपये कमिशन काढून उर्वरित रक्कम फरारी आरोपींना दिली. जीवाची मजा करण्यासाठी गोव्याला गेल्यावर तो केसिनोमध्ये काही पैसे हरला होता अशी माहिती समोर आली आहे.
तक्रारदार हे संगीत शिक्षक असून गेल्या वर्षी त्यांना मोबाईलमध्ये एक मेसेज आला होता. बिटकॉइनमध्ये रोज दोन हजार रुपये नफा मिळणार असे त्या मेसेजमध्ये नमूद होते. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने आर्गोगश हे अॅप्स डाउनलोड केले. त्यानंतर तक्रारदार यांना आरव खुराणा नावाच्या व्यक्तीने पह्न करून बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास कसा नफा मिळेल हे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने सुरुवातीला दोन हजार रुपये गुंतवले. पैसे गुंतवल्यावर सुरुवातीला त्याच्या खात्यात पैसे जमा झाले. नफा जमा होत असल्याने त्यांनी 2 लाख 43 हजार रुपये गुंतवले. पैसे गुंतवल्यानंतर तक्रारदार यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. त्यानंतर काही दिवसांनी ते अॅप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकत तो गुंतवणूकदारांचा व्हॉट्सअॅप ग्रुप डिलिट करण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने माटुंगा पोलीस ठाणे गाठले.
परिमंडळ-4 चे उपायुक्त विजय पाटील यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या पथकातील उप निरीक्षक राजाभाऊ गरड, संतोष पवार, मंगेश जऱहाड आणि पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान ज्या खात्यात पैसे जमा झाले त्याची माहिती काढली. ते खाते बंगलोरच्या बिस्मिला नगर येथील असल्याचे समजले. पोलिसांनी दोन दिवस फिल्डिंग लावून मोहंमदला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पासबुक, डेबिट कार्ड, मोबाईल हस्तगत केला आहे. फसवणुकीच्या गुन्हय़ात त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
डिलिव्हरी बॉय झाला लखपती
मोहंमद हा पूर्वी एका पंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. त्याला फरार आरोपीने बँक खाते वापरण्यास दिल्यास मोठी रक्कम देऊ असे सांगितले. त्यानंतर मोहंमदच्या खात्यात 71 लाख रुपये जमा झाले. कमिशनची रक्कम घेऊन तो गोव्याला गेला होता. तसेच काही पैशातून कर्ज देखील फेडले होते.
परदेशी आयपी अॅड्रेस
फसवणुकीच्या गुह्यात आरोपींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. बहुतांश आयपी अॅड्रेस हे परदेशातील असल्याचे तपासात समोर आले आहे. तर आरोपीने काही महिन्यांपूर्वी बनावट बँक खाती तयार केली होती. आरोपी हे हजारो जणांना मोबाईलवर गुंतवणुकीसाठी मेसेज करायचे.


























































