
राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यातील मंदिरांच्याबाहेर आंदोलन केले. मात्र या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले.
राज्यातील मंदिरे पुन्हा उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने मुंबईपासून संपूर्ण राज्याच्या वेगवेगळ्य भागात आंदोलन केले. मुंबईत सिध्दिविनायक मंदिराच्याबाहेर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी घंटानांद आंदोलन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या आंदोलनांना ताब्यात घेतले. शिर्डीलाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. राज्यातल्या वेगवेगळ्या मंदिरांच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मंदिरांच्या बाहेर धार्मिकस्थळे उघडण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन केले.





























































