
सामना ऑनलाईन । चेन्नई
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तामिळनाडूत राजकीय वातावरण तापले आहेत. गेल्या निवडणुकीत 39 पैकी 37 जागा जिंकलेल्या ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाने भाजपसोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीयमंत्री पीयूष गोयल व उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.
सोमवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात शिवसेनेच्या सर्व मागण्या मान्य करत युतीची घोषणा केली. त्यानंतर आज तामिळनाडूतही अण्णा द्रमुक सोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री जयललिता व एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर राजकीय अस्थिरता तामिळनाडूत निर्माण झाली आहे. यानंतर अनेक राजकीय चढाउतार तामिळनाडूत बघायला मिळाले आहे. मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी व उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप विधानसभेला सहकार्य करणार आहेत. तर लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होणार असल्याचे केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. भाजपला मात्र पाच जागा मिळणार असून, अण्णा द्रमुकचा सहयोगी पक्ष पट्टली मक्कल कांची (पीएमके) पक्षाला 7 जागा लोकसभेला मिळणार आहेत.


























































