
सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला असतानाच आता महायुतीतील भाजपच्या मित्रपक्षांकडूनही चार मंत्रीपदांची मागणी करण्यात आली आहे. रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना या भाजपच्या मित्रपक्षांकडून चार मंत्रीपदांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये रिपाइंला कॅबिनेट मंत्रीपदही हवे असून याबाबत एक ते दोन दिवसांत निर्णय घ्यावा अशी मागणी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडूनही करण्यात आली आहे.
मित्रपक्षांची बैठक रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्या शासकीय निवासस्थानी आज पार पडली. सत्तास्थापनेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

























































