
भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची अनपेक्षितपणे निवड करण्यात आली असून, ही निवड म्हणजे भाजपचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजय देशमुख यांना धक्का समजला जातो. या निवडीमुळे राजकीय सूडनाटय़ाला सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कल्याणशेट्टी हे फडणवीस गटाचे, तर विजय देशमुख हे पंकजा मुंडे गटाचे आमदार म्हणून ओळखले जातात. मात्र, या लढय़ात सुभाष देशमुख गटाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून, सध्या ते जामिनावर आहेत. श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. जिल्हाध्यक्षपद स्वीकारण्यास अनेकांनी अनुत्सुकता दाखविल्याने श्रेष्ठाRपुढे पेच निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांची नावे नुसतीच चर्चेत ठेवण्यात आली होती. दरम्यान, सोलापूर जिह्यात माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख व माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख यांनी आपल्या गटाकडे जिल्हाध्यक्षपद घेण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली होती. यात सुभाष देशमुख यांनी विजय देशमुख यांच्यावर पलटवार करीत आपले खंदे समर्थक, आमदार कल्याणशेट्टी यांना जिल्हाध्यक्षपदी बसविण्यात बाजी मारली.
विजय देशमुखांच्या मतदारसंघात कल्याणशेट्टींचा संपर्क
सुभाष देशमुख यांचे समर्थक असलेले आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गेल्या दोन वर्षांपासून विजय देशमुख यांच्या शहर उत्तर मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. विजय देशमुखांच्या विरोधकांची मोट बांधण्यात कल्याणशेट्टींनी पुढाकार घेतला असून, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय देशमुख यांना धक्का देण्यासाठी सुभाष देशमुख व सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यूहरचना आखली आहे. आमदार विजय देशमुख हे पुत्र नगरसेवक किरण देशमुख यांना, तर आमदार सुभाष देशमुख हे पुत्र रोहन देशमुख यांच्या राजकीय वर्चस्वासाठी मार्ग प्रशस्त करीत आहेत. त्यामुळे आमदार
डोंगरे, मोहिते, कांबळेंची नावे बाजूला सारली
सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. एके काळी गडकरींच्या जवळ असणारे सुभाष देशमुख हे फडणवीसांच्या गोटात जात जिह्याचे अध्यक्षपद आपल्या समर्थकाला मिळवून देण्यात यशस्वी झाले आहेत. यापूर्वीही शहाजी पवार, श्रीकांत देशमुख हेही देशमुख गटाचेच जिल्हाध्यक्ष होते. यावेळी मात्र माजी पालमकंत्री विजय देशमुख यांनी मोहोळचे विजयराज डोंगरे, अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील व शिवाजी कांबळे यांच्यासाठी जोर लावला होता. परंतु पंकजा मुंडे गटाचे म्हणून ओळखले जाणारे आमदार विजय देशमुख यांच्या समर्थकांची नावे नकळतपणे बाजूला सारण्यात आली आहेत. सचिन कल्याणशेट्टी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड म्हणजे आमदार विजय देशमुख यांना बसलेला धक्का समजला जात
























































