Breaking- भाजपची चौथी यादी जाहीर, खडसे आणि तावडेंचे तिकीट कापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीमुळे एकनाथ खडसे यांचा पत्ता कट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांचेही तिकीट कापण्यात आले असून ते ज्या बोरिवली मतदारसंघातून निवडून आले होते त्या मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपची चौथ्या यादीमध्ये एकूण 7 नावांचा समावेश असून ही नावे खालीलप्रमाणे आहेत.

  • मुक्ताईनगर-रोहिणी खडसे
  • काटोल चरणसिंह ठाकूर
  • तुमसर-प्रदीप पाडोळे
  • नाशिक पूर्व- राहुल ढिकले
  • बोरिवली-सुनील राणे
  • घाटकोपर पूर्व- पराग शहा
  • कुलाबा-राहुल नार्वेकर

एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्याप्रमाणेच भाजपने प्रकाश महेता यांचेही तिकीट कापले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पक्षाने तिकीट नाकारले असून या सगळ्यांसाठी तिकीट नाकारले जाणे ही मोठी धक्कादायक बाब मानली जात आहे.

भाजपच्या पांडवांना वनवास! खडसेंना नकार; बावनकुळे, तावडे, पुरोहित, मेहता टेन्शनमध्ये

 

राज पुरोहित यांचाही पत्ता कापण्यात आला असून तिथे राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांचे पहिल्या यादीत नाव नसल्याने त्यांनी यादीत नाव येईल की नाही याची वाट न पाहता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते आपला अर्ज मागे घेतात की नाही याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे. आज सकाळी 11 वाजता खडसे यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये ते आपली पुढची भूमिका जाहीर करतील.