
सामना प्रतिनिधी । मुंबई
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय (ए) व रासप महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी सोमवारी एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी कोटक यांनी सकाळी दादरच्या चैत्यभुमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन केले. त्यानंतर शिवाजी पार्क येथील दिवंगत शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानाला भेट देऊन दर्शन घेतले.
Photo : हजारो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत मनोज कोटक यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
ईशान्य मुंबईसह मुंबईत येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील या मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपत आहे. तत्पुर्वी एक दिवस आधी सोमवारी मनोज कोटक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते विनोद तावडे, शिवसेना नेते लिलाधर डाके, माजी खासदार, किरीट सोमय्या, शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

























































