चित्रा वाघ यांची रूपाली चाकणकरांवर आगपाखड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेल्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगावरील अध्यक्षपदाच्या निवडीआधीच आगपाखड केली. राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आल्यानंतर ‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका’ असे ट्विट करीत चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला. मात्र यावरून सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीका झाल्यानंतर मात्र त्यांना आपल्या ट्विटवरूनच घुमजाव करावे लागले आहे.

काही तासांतच घुमजाव

या वादात विद्या चव्हाण यांनीही उडी घेतली. पीडित महिलेला घरी ठेवून एका आमदाराला ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला. यावर वाघ यांच्याकडून सिद्ध करून दाखवा असे आव्हान विद्या चव्हाण यांना द्येण्यात आले. मात्र ट्विटमुळे टीकेच्या धनी झालेल्या चित्रा वाघ यांनी त्यावरून घुमजाव केले. त्या म्हणाल, ‘अशा ठिकाणी राजकीय महिलांची नियुक्ती साधारणपणे केली जाते. मी कुणालाही शुर्पणखा म्हटलेलं नाही. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या, तर त्यांना विरोध करणारी मी कोण आहे? त्यांना शुभेच्छाच आहेत. फक्त जी कुठली महिला येईल, तिने रावणाला साथ देऊ नये, इतकीच अपेक्षा.