भाजपला गरज नसेल तर स्वतंत्र लढणार

विधानसभेच्या 288 पैकी 240 जागा भाजप लढवेल आणि 48 जागा शिंदे गटाला दिल्या जातील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली असताना भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. भाजपला आमची गरज नसेल, तर आम्ही स्वतंत्र लढणार, असे जानकर म्हणाले.

आपल्या चौकात आपली औकात वाढवली पाहिजे, असे नमूद करताना आम्हाला सोबत घेण्याची भाजपची इच्छा नसेल तर आम्ही त्यांच्या मागे लागणार नाही. आमच्या ताकदीवर आम्ही सर्व जागा लढू. त्यात काही ठिकाणी जिंकू, तर काही ठिकाणी पराभूत करण्याच्या भूमिकेतून जाऊ, असे सूचक विधान जानकर यांनी केले. ते मनोर येथे माध्यमांशी बोलत होते.