विधानसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणावरून भाजप नेत्यांत चांगलीच लागली आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनीच आपल्याला निवडणुकीचे तिकीट मिळू दिले नाही, असा थेट हल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
राज्याच्या सत्तेतून भाजप पायउतार झाल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे. परळी आणि मुक्ताईनगर या भाजपच्या पारंपरिक मतदारसंघांत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवास पक्षातील लोकच जबाबदार आहेत. तसेच पक्षातील काही लोकांना जाणीवपूर्वक उमेदवारी नाकारण्यात आल्याने फडणवीस यांच्या विरोधात भाजपात असंतोष खदखदत असतानाच खडसे यांनी फडणवीस आणि महाजन यांच्यावर थेट आरोप करून पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणाला तोंड पह्डले आहे.
फडणवीस यांच्या स्वार्थी राजकारणाचा बुरखा फाडला
फडणवीस आणि महाजन यांनी मला राजकारणातून संपविण्याचा डाव जाणीवपूर्वक आखला असून त्यासाठीच आपल विधानसभेचे तिकीट कापले,असा आरोप खडसे यांनी केला आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केल्यामुळेच विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही, असा हल्लाबोल करत फडणवीसांच्या स्वार्थी राजकारणाचा बुरखा फाडला आहे.
अन्य लोक चालतात, मग नाथाभाऊ का नाही?
इतर पक्षांतील जे लोक घेतले त्यांच्यावर कोणताही आक्षेप नव्हता असं आहे का? किंवा आक्षेप असतानाही जाणूनबुजून घेतलं का? याचं उत्तर हवं. अन्य लोक चालतात मग नाथाभाऊ का चालत नाहीत? नाराजी असू शकते पण ती कशाबद्दल होती हेदेखील सांगायला हवं होतं. मी अशी कोणती मोठी चूक केली होती. मी स्पष्टवक्ता आहे. परिणामांची चिंता नाही.- एकनाथ खडसे
खडसेंचे आरोप चुकीच्या माहितीच्या आधारे
नाथाभाऊंना चुकीची माहिती देण्यात आली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत असा पुठलाही विरोध किंवा चर्चादेखील झाली नाही. राज्यात चंद्रशेखर बावनपुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, राज पुरोहित यांनादेखील तिकीट मिळाले नाही. पुणीतरी सांगितले म्हणण्यापेक्षा चुकीच्या माहितीच्या आधारे असे बोलणे योग्य नाही. खडसे यांचे तिकीट आम्ही कापण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय निवड समितीने सर्व निर्णय केले आहेत. – गिरीश महाजन
चंद्रपूरमध्ये पराभव का झाला? जाहिरातीतून अहिर यांचा मुनगंटीवारांवर निशाणा
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा आहे. अहिर यांनी नवीन वर्षानिमित्त वर्तमानपत्रात दिलेल्या शुभेच्छा जाहिरातीतून भाजप नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे पाच आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अनेक नगरपरिषदा भाजपच्या ताब्यात असताना भाजपचा पराभव का झाला, असा प्रश्न केला आहे. मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर मतदारसंघात अहिर यांना लोकसभा निवडणुकीत तब्बल 31 हजारांची पिछाडी मिळाली होती.
पराभव झाला त्या ठिकाणी माझा संबंध नव्हता
देशाचे माजी गृहाराज्यमंत्री अहिर यांचा ज्या ठिकाणी पराभव झाला त्या ठिकाणी माझा काहीही संबंध नव्हता, असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी अहिर यांचे आरोप फेटाळून लावले. मी महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचो. पालकमंत्री म्हणून मी विकासाकडे लक्ष द्यायचो. ते स्वतः मंत्री होते ना? पक्षांतर्गत गोष्टी अशा जाहीर करू नयेत, असे मुनगंटीवार म्हणाले.


























































