
#MahaElection 2019 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपस्थित राहिले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत दिले.
‘सत्ताधारी पक्षातील अनेक लोक हे तीन-चार महिन्यांपासून आमच्या संपर्कात आहेत. जे त्या पक्षात काम करत होते किंवा पक्षात काम करताहेत त्यांना हे कळून चुकले आहे की इथे भवितव्य, संधी नाही. समाजकामात काम करणाऱ्या व्यक्तीला भवितव्य नसेल तर तो पर्याय शोधतो, असे पवार म्हणाले. तसेच पर्याय एका दिवसात सापडत नसतो, महिने वर्षभर शोध सुरू असतो, असेही त्यांनी सांगितले.
पुन्हा एकदा एकनाथ खडसेंचे नाव घेऊन प्रश्न विचारला तेव्हा, ‘नाथाचा जन्म बारामतीला झाला. नाथा बारामतीच्या कुटुंबातील आहे’, असे म्हणत त्यांनी वेगळे संकेत दिले.

























































