इचलकरंजीत भाजपकडून शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम!

कोल्हापूर महापालिकेत भाजप आणि शिंदे गट यांच्यात युती आहे, परंतु भाजपने या निवडणुकीत शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे. भाजपने युती असूनही आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने शिंदे गटाचे उमेदवार टेन्शनमध्ये आले आहेत.

इचलकरंजी मनपा निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला सुटलेल्या जागांवर एबी फॉर्म दिल्याने अडचण निर्माण झाली आहे. इचलकरंजीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 10 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे एकंदरीतच महायुतीमध्ये 65 जागांसाठी जवळपास 78 फॉर्म देण्यात आले आहेत. एकूण 65 जागांसाठी तब्बल 78 एबी फॉर्मचे वाटप केल्याने तब्बल 13 जागांवर अधिकचे उमेदवार आहेत. भाजपने 56 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. शिंदेसेनेकडून 10 उमेदवारांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार गटाने तब्बल 12 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. काही ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढत’ या नावाखाली उमेदवार रिंगणात ठेवून जो निवडून येईल, त्याला महायुतीचा अधिकृत उमेदवार मानले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.