
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बेगुसरायमध्ये भाजप उमेदवार गिरीराज सिंह यांच्या विरोधात कम्युनिस्ट पक्षाच्या कन्हैय्या कुमारने दंड थोपटल्याने भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची झाली होती. सध्या गिरीराज सिंह हे 87 हजार मतांनी पुढे जाताना दिसत आहेत.
आकडे जरी खाली वर झाले तरी गिरीराज जिंकू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गिरीराज सिंह हे विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांन यश मिळताना दिसत आहे. कन्हैय्या कुमारसाठी अभिनेता प्रकाश राज आणि कॉमेडियन कुणाल कामरा प्रचारात उतरले होते. त्याचा फायदा कन्हैय्याला होताना दिसत नाहिये.

























































