केरळममध्ये भाजपचे दोन सिलिंडरचे प्रलोभन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गॅसच्या तुटवडय़ामुळे देशभरात नागरिक वणवण भटकत असताना केरळममध्ये मते मिळवण्यासाठी भाजपने मोफत सिलिंडर्सचे प्रलोभन दाखवले आहे. राज्यातील गरीब कुटुंबांना वर्षाला दोन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा भाजपने केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात गरजू महिला, विधवा आणि 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 3 हजार रुपये देणार, अशी घोषणा भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी केली.