
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भारतीय जनता पक्ष हा व्यक्तिकेंद्रित नसून विचारधारेचा पक्ष आहे. असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
गडकरी म्हणाले की, “भाजप हा ना कधी अटल वाजपेयींचा होता ना आडवाणींचा. तसेच हा पक्ष ना अमित शहांचा होऊ शकत ना नरेंद्र मोदींचा. भाजप हा विचारधारेवरील आधारित पक्ष आहे. म्हणून भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष आहे असे म्हणने चुकीचे आहे. तसेच भाजप आणि मोदी हे परस्परपुरक आहेत असेही गडकरी म्हणाले.
तसेच “भाजपमध्ये कधीच कुठल्याही एका पक्षाची सत्ता नाही चालणार. सरकारचे सर्व निर्णय संसदीय बोर्डाकडून घेतले जाता. पक्ष जर मजबूत असेल आणि त्यांचे नेते कमकुवत असतील तर निवडणुका नाही जिंकता येत. तसेच नेता मजबूत असेल आणि पक्ष कमकुवत असेल तरीही परिस्थिती तसेच असेल.” परंतु लोकप्रिय नेत्यांनी नक्कीच पुढे आले पाहिजे असे मतही गडकरी यांनी व्यक्त केले.

























































