शत्रुघ्न सिन्हांचे तिकीट कापले, पाटना साहीबमधून रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा पाटणा साहीब मतदारसंघातून निवडणूक लढवत असून ते 74 हजार मतांनी पिछाडीवर आहेत

सामना ऑनलाईन, पाटणा

बिहारमधील लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी भाजप आणि जनता दल युनायटेडने प्रसिद्ध केली आहे. 40 उमेदवारांची नावे या दोन पक्षांनी जाहीर केली असून यामध्ये केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचाही समावेश आहे. भाजपचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली.

बिहारमध्ये भाजप आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी 17 जागा लढणार आहे.रामविलास पासवान यांचा लोक जनशक्तीपक्ष 6 जागा लढणार आहे.

भाजपवर सातत्याने तोंडसुख घेणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट भाजपने कापले असून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गिरीराज सिंह यांनी तीव्र विरोध दर्शवून देखील नवादा लोकसभा मतदारसंघाऐवजी त्यांना बेगूसरायमध्ये पाठवण्यात आलं आहे. शाहनवाज हुसेन यांचे देखील तिकीट कापण्यात आले असून त्यांनी 2014 साली लढवलेला भागलपूर मतदारसंघ भाजपने जनता दल युनायटेडला दिला आहे.

  • पाटणा साहीब- रवीशंकर प्रसाद
  • पूर्व चंपारण- राधामोहन सिंह
  • सारण- राजीव प्रताप रुडी
  • बेगूसराय-गिरीराज सिंह

या मंत्र्यांच्या आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची नावे 40 जणांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान हा जमुई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.