भाजप आमदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकच्या मुदिगेरे येथील भाजप आमदाराला चिक्कमगलुरूच्या हालेमाने गावातील लोकांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. आमदार एमपी कुमारस्वामी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. हत्तीचे हल्ले थांबवण्याबाबत स्थानिकांनी आमदारांना प्रश्न विचारला, पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी मारहाण केली.