
भाजप आमदार किसन कथोर यांच्या गाडीची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली आहे. या अपघातात दोन बाईकस्वारांचा मृत्यू झाला आहे. कल्याणजवळील रायते येथे हा अपघात झाला आहे.
मिळेलंय माहितीनुसार, कथोरे हे टिटवाळा येथून कार्यक्रम संपवून बदलापूरला परतत असताना वाहुली गावाजवळ दुचाकीस्वाराला कथोरे यांच्या गाडीने धडक दिली. या अपघातात कथोरे यांच्या मानेला किरकोळ दुखापत झाली असली, तरी दुचाकीवरील तरुण तरुणीचा मृत्यू झाला आहे. अमित नंदलाल सिंग आणि सिमरन दीपक सिंग अशी या दोघांची नावे असून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात कथोरे यांचे चालक आणि सुरक्षारक्षक यांनाही यात किरकोळ दुखापत झाली. अपघात नेमका कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून आमदार किसन कथोरे यांनी आपण सुखरूप असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.





























































